नगर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी 'एसीबीच्या' जाळ्यात

नगर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी 'एसीबीच्या' जाळ्यात
 तक्रारदार- पुरुष  वय-२९ रा. हिवरगांव पावसा, ता- संगमनेर.    जि.अहमदनगर

आरोपी = श्रीधर परसराम गडाख, वय  ४०, धंदा - नौकरी, मदतनीस (बाह्य स्त्रोत  कर्मचारी) म.रा.वि.वि.कंपनी,  चंदनापुरी कक्ष - १, ता.संगमनेर.

रा. हिवरगांव पावसा, सब स्टेशन शेजारी. ता. संगमनेर. जि.अहमदनगर.  

 लाचेची मागणी- २०००/-₹ 

 लाच स्विकारली  २०००/ ₹ हस्तगत रक्कम- २०००/-रु लाचेची मागणी - ता.३०/१२/२०२१  लाच स्विकारली -ता. ३०/१२/२०२१

   लाचेचे कारण -.तक्रारदार यांनी त्यांचे  येथील राहते घरी विद्युत जोडणी घेणे करिता आईचे नांवे कोटेशन भरले होते. यातील आरोपी लोकसेवक यांनी नवीन मीटर जोडणी  मिळेपर्यंत अनाधिकृत तात्पुरते मीटर जोडणी करुन दिले व त्या मोबदल्यात यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे ₹ २०००/- ची मागणी केली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपीने पंचासमक्ष  २०००/- ₹ लाचेची  मागणी केल्याचे निष्पन्न झाले व सदरची रक्कम आज दि  ३०/१२/२०२१ रोजी आयोजित लाचेचा सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे कडुन पंचा समक्ष दर्शन किराणा ॲंड जनरल स्टोअर, हिवरगांव पावसा ता- संगमनेर येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे. संगमनेर तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची की कार्यवाही सुरू आहे.

 हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

 सापळा अधिकारी:- पुष्पा निमसे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर

 पर्यवेक्षण अधिकारी* हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर

सापळा पथक:- पो ना रमेश चौधरी,  पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पो ह. हरुन शेख, राहुल डोळसे.

मार्गदर्शक -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

मा. नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.

 मा:- सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

आरोपीचे सक्षम अधिकारी: ,  प्रोपा.प्रथमेश इलेक्ट्रिकल (बाह्य स्त्रोत कंपनी), जि- अहमदनगर .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post