फसवणूक प्रकरणी तीन नामांकित बिल्डरवर गुन्हा दाखल

 पुण्यात फसवणूक प्रकरणी तीन नामांकित बिल्डरवर गुन्हा दाखलपुणे – अस्तित्वात नसलेला रस्ता दाखवून बांधकाम आराखडा मंजूर करून घेत, फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील तीन नामांकित बांधकाम व्यवसायिकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश मनोहर येवले, शाम जग्गनाथ शेंडे आणि सुनील पोपटलाल नहार अशी या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र बाळानाथ भुंडे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली होती.संबंधित बांधकाम व्यावसायिकाचे बावधन येथील पेब्बल अरबनिया या बांधकाम प्रकल्प आहे. यात प्रकल्पात फिर्यादी राजेंद्र भुंडे हे मूळ जागा मालक आहेत. त्यांनी येवले, शेंडे आणि नहार यांच्या एएसआर प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स या भागीदारी फर्मला पेब्बल ‘अरबनिया’ या गृह प्रकल्पासाठी काही जागा दिली आहे.  या प्रकल्पाच्या जवळ भुंडे यांची दुसरी पाच गुंठे जागा आहे. हि जागा त्यांनी येवले यांना दिलेली नाही. मात्र, या जागेतून येवले यांनी बेकायदा रस्ता बनवल्याचे भुंडे यांचे म्हणणे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post