पत्रकार रोहिदास दातीर खून प्रकरणात , फरार झालेला आरोपी कान्हू मोरे जेरबंद

 पत्रकार रोहिदास दातीर खून प्रकरणात , फरार झालेला आरोपी कान्हू मोरे जेरबंदअहमदनगर –   राहुरी तालुक्यात पत्रकार रोहिदास दातीर यांचा अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी कान्हु मोरे आणि त्याचे साथिदारांविरोधात भादवि कलम ३०२, ३६३, ३४१, १२० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. 

पोलिसांनी कारवाई करत  मोरे यास अटक केली होती . मात्र तो न्यायालय कोठडीत असताना त्यास कोरोना आजार झाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल  करण्यात आला होता. परंतु त्याला नंतर मुतखडयाचा त्रास होऊ लागल्याने २८ ऑगस्ट रोजी डॉक्टरानी त्यास ससून हॉस्पीटल येथे शिप्ट करणेबाबत सांगितलेने ससून हॉस्पिटल येथे घेवून जाण्यासाठी अॅब्युलन्स बोलवून त्यास त्यामध्ये बसण्यासाठी सांगितले असता त्याला लघुशंका आल्याने तो लघुशंकेच्या बहाण्याने तेथून पोलीसांचे कायदेशीर रखवालीतून पळून गेला होता.या घटनेनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post