अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दिला तर ४ दिवसात राज्य विकून खातील....

 अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दिला तर ४ दिवसात राज्य विकून खातील....मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री अनुपस्थित राहिले. त्यामुळे भाजप नेत्यांकडून जोरदार टीका केली जातेय. तसंच मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत कारभार आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्याकडे देण्याचा सल्लाही दिला जातोय. मात्र, गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांच्या हाती राज्य दिले तर ते चार दिवसांत विकून खातील, अशी घणाघाती टीका केलीय.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेत विविध विषयांवरून जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. अशावेळी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या कारभार आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अजित पवारांकडे कारभार देण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, अजित पवारांच्या हातात राज्य दिलं तर ते चार दिवसांत विकून खातील, अशी जळजळीत टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post