राज्यातील 'या' मंत्र्यावर कॉंग्रेस हायकमांड नाराज, अध्यक्षपदावरून केली गच्छंती

 राज्यातील या मंत्र्यावर कॉंग्रेस हायकमांड नाराज, अध्यक्षपदावरून केली गच्छंतीनवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडने धक्का दिला आहे. नितीन राऊत यांची काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरून गच्छती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश लिलोठिया यांची निवड करण्यात आली आहे.


गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यात वाद पेटला आहे. या अंतर्गत वादाचे पडसाद जाहीरपणे उमटायला लागले आहे.  काँग्रेसच्या एससी विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या विभागाच्या अध्यक्षपदी राजेश लिलोठिया यांची निवड केली आहे. त्यामुळे नितीन राऊत यांना एससी विभागाचे अध्यक्षपद सोडावं लागलं आहे. नितीन राऊत काँग्रेस च्या एससी विभागाचे अध्यक्ष होते. सोनिया गांधी यांच्या आदेशावरून राऊत यांची गच्छती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post