नगर तालुक्यातील'या'गावात राजकीय वादंग, पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी

 नगर तालुक्यातील'या'गावात राजकीय वादंग, पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादीनगर तालुक्यातील दरेवाडी येथील ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांमध्ये राजकीय वादातून तुफान हाणामारी झाली. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारातही दोन्ही गट समोरासमोर भिडल्याने शिवराळ भाषेत शिवीगाळ करत चांगलाच राडा घालण्यात आला. या प्रकरणी सरपंच-उपसरपंचासह शिवेसना - भाजपाच्या जिल्हा पदाधिकार्‍यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


नगर तालुक्यातील दरेवाडी ग्रामपंचायतमध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या भावजय सरपंच तर भाजपाचेच अनिल करांडे उपसरपंच आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात राजकीय वाद सुरू झाले. या वादाचे पर्यावसन सोमवारी (दि.13) जोरदार राड्यात झाले. सकाळी वाकोडी फाट्यावर वाद झाल्यावर दोन्ही गट भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता तेथेही दोन्ही गटात पोलिसांसमोर चांगलीच वादावादी झाली. एकमेकांना शिवराळ भाषेत शिवीगाळ करण्यात आली. पोलिसांनाही अरेरावी करण्यात आली. या हाणामार्‍या व वादंगाप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत. 
 

सरपंच स्वाती सुभाष बेरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उपसरपंच अनिल मल्हारी करांडे, वैभव मल्हारी करांडे, योगेश मच्छिंद्र बेरड, संतोष किसन करांडे, नवनाथ कराळे, रेखा अनिल करांडे, आशा काळे, अन्नपूर्णा संतोष करांडे (सर्व रा.दरेवाडी) यांच्याविरुद्ध भा.दं.वि.क. 327, 324, 323, 504, 506, 452, 354, 427, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपसरपंच अनिल करांडे व त्याच्या साथीदारांनी सोमवारी (दि.13) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास वाकोडी फाटा येथे असलेल्या विवेक कलेक्शन या दुकानात घुसून सरपंच पदाचे अधिकार मला का देत नाही? असा जाब विचारत शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच इतर आरोपींनी दुकानातील साहित्याचे नुकसान केले. तसेच गळ्यातील 3 तोळ्यांचे सोन्याचे गंठण व दुकानामधील गल्ल्यात असलेली रोकड जबरदस्तीने काढून नेल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. 


दुसरी फिर्याद एका 19 वर्षीय तरुणीने दिली आहे. या फिर्यादीवरुन वैभव संजय निंबाळकर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास रतन बेरड, सुभाष रतन बेरड, सरपंच स्वाती सुभाष बेरड, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक आशा संजय निंबाळकर, मच्छिंद्र भानुदास बेरड, प्रताप गुलाब भोगाडे, नितीन संपत बेरड, विक्रम गुलाब भोगाडे (सर्व रा.दरेवाडी, ता.नगर) तसेच राजू भागवत कोरके, ज्योती सतीश काकडे, सतीश काकडे (रा.नागापूर, ता.नगर) यांच्याविरुद्ध भा.दं.वि.क. 354, 354 (ड), 327, 324, 323, 504, 143, 147, 148, 149, 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेयातील आरोपी वैभव निंबाळकर हा फिर्यादी युवतीशी पाठलाग करुन छेडछाड करीत होता. त्यास आरोपी मच्छिंद्र बेरड व सुभाष बेरड हे प्रोत्साहन देत होते. फिर्यादीस झालेल्या छेडछाडीबाबत फिर्यादी व साक्षीदार हे वाकोडी फाट्यावर सुभाष बेरड यांच्या दुकानात गेले असता तेथे आरोपींनी एकत्र येवून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रोडने मारहाण केली. तसेच साक्षीदार असलेल्या दोन महिलांना मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओढून नेले. मारहाण करणारा आरोपी विक्रम भोगाडे यास मच्छिंद्र बेरड व आशा निंबाळकर या प्रोत्साहन देत होत्या तसेच याबाबत फिर्याद देण्यासाठी पोलिस स्टेशनला आल्यानंतर पोलिस स्टेशनच्या आवारातही फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहेया दोन परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारात केलेल्या राड्याप्रकरणी पोलिसांच्यावतीने दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या राड्यामुळे दरेवाडी गावात वातावरण तणाव पूर्ण झाले असून तेथे मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post