पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख’ मुंबई : संसदेचं हिवाळी अधिवेशन  सुरु आहे. या अधिवेशन काळात निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेतील 12 खासदार धरणं आंदोलन करत आहेत. या खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोवरुन भाजप नेत्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केलीय. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. तसंच राणे बंधुंनीही राऊतांचा खोटक टोले लगावले आहेत.

आमदार नितेश राणे यांनीही संजय राऊतांवर टीका केलीय. संजय राऊत खुर्ची उचलताना कसलंही आश्चर्य वाटलं नाही. कारण, शिवसेनेची जी अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीने करुन ठेवली आहे, ती खुर्ची उचलण्यापेक्षा जास्त चांगली नाही. कधी राहुल गांधी, सोनिया गांधी यांना भेटणं, कधी प्रियंका गांधी यांची भेट घेण्यासाठई धावपळ करणं, यापेक्षा संजय राऊत यांनी एकदाच आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करावा. जेणेकरुन यूपीएमध्ये जाण्याचं कष्टही वाचेल, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केलीय.

तर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत ‘पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख’, असा टोला लगावला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post