सहकार पॅनलने पतसंस्थेला अच्छे दिन आणले अपक्ष उमेदवार - अनिल देवकर

 सहकार पॅनलने पतसंस्थेला अच्छे दिन आणले अपक्ष उमेदवार - अनिल देवकर

म.न.पा. पतसंस्था निवडणुकीतील अपक्ष उमेदवार अनिल देवकर यांचा सहकार पॅनल ला पाठिंबा 
नगर - अहमदनगर महानगरपालिका सहकारी पतसंस्थेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. इतर मागास प्रवर्गातील अपक्ष उमेदवार अनिल गोविंद देवकर यांनी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देऊन गेल्या 3 वर्षांमध्ये सभासदांच्या उज्वल भविष्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले. सहकार पॅनलच्या उमेदवारांनी म.न.पा. सहकारी पतसंस्थेला अच्छे दिन आणले आहेत. सभासदांच्या कर्जावरील व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात केली त्यामुळे सभासदांची आर्थिक बचत झाली. याच बरोबर पतसंस्था स्व भांडवली केली. त्यामुळे सभासदांच्या हक्काच्या पतसंस्थेचे सहकार क्षेत्रामध्ये नाव उज्वल केले आहे. यासाठी मी आज सर्व सभासदांना सांगू इच्छितो की सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मतदान करून पतसंस्थेच्या उज्वल भविष्यासाठी मदत करावी असे ते म्हणाले.

        म.न.पा. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये इतर मागास प्रवर्गातील अपक्ष उमेदवार अनिल देवकर यांनी सहकार पॅनलच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. पॅनल प्रमुख बाबासाहेब मुदगल, मार्गदर्शक जितेंद्र रारसर, उमेदवार विजय कोतकर, अजय कांबळे, बलराज गायकवाड, विकास गिते, कैलास चावरे, सतीश ताठे, श्रीधर देशपांडे, बाळासाहेब पवार, सोमनाथ सोनवणे, गुलाब गाडे, प्रमिला पवार, उषा वैराळ, किशोर कानडे, बाळासाहेब गंगेकर आदी उपस्थित होते.

         पॅनल प्रमुख बाबासाहेब मुदगल व मार्गदर्शक जितेंद्र सारसर म्हणाले की आम्ही सर्व संचालक मंडळाने गेल्या 3 वर्षांमध्ये केलेल्या कामाची शाबासकी सभासदांबरोबर अपक्ष उमेदवार अनिल देवकर यांनी दिल्याबद्दल आमच्या केलेल्या कामाचे चीज झाले आहे. यापुढील काळातही सभासदांना विश्वासात घेऊन पतसंस्थेच्या विकासाचा आलेख असाच उंचावत राहील आणि सहकार क्षेत्रामध्ये अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेचा एक मोठा दबदबा निर्माण होईल असे काम उभे करू असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post