प्रियकराची अल्पवयीन प्रेयसीसह विष पिऊन आत्महत्या,

प्रियकराची अल्पवयीन प्रेयसीसह विष पिऊन आत्महत्या


  

अमरावती : प्रेमी युगुलाने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाघोली येथील जोडप्याने टोकाचं पाऊल उचललं. 

 घटना मंगळवार 14 डिसेंबरला दुपारी समोर आली. संबंधित 25 वर्षीय तरुणाचे गावातील अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी तरुण 17 वर्षीय प्रेयसीसोबत श्री क्षेत्र सालबर्डी येथे गेले होते. दोघं लहान महादेवाच्या भुयार मार्गावर असलेल्या हत्तीडोहाच्या पहाड परिसरात गेले.

प्रेमी युगुलाने विषारी द्रव्यं प्राशन केली. त्यानंतर दोघांचीही प्रकृती बिघडली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. संध्याकाळी उपचारादरम्यान प्रियकाराचा मृत्यू झाला. तर बुधवारी सकाळी प्रेयसीचीही प्राणज्योत मालवली. मात्र त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post