आमच्या कार्यकर्त्याच्या मागे लागाल तर डाव तुमच्यावरच उलटेल,पराभवाच्या नैराश्यातुन ' काहींकडुन ' गुन्ह्यात अडकवण्याचा कुटील डाव

 राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे : आमच्या कार्यकर्त्याच्या मागे लागाल तर डाव तुमच्यावरच उलटेल

पराभवाच्या नैराश्यातुन ' काहींकडुन ' गुन्ह्यात अडकवण्याचा कुटील डावअहमदनगर - आम्ही राजकारण कटकारस्थाने याच्या नादी न लागता लोकांची कामे करण्यावर भर देतो . मात्र काहीजण पराभवाच्या नैराश्यातुन अजुन बाहेर पडलेले दिसत नाही . म्हणुनच आपल्या राजकारणाला अडचण ठरणाऱ्या निष्पाप कार्यकर्त्यांना विनाकारण खोटया पोलिस केसेसमध्ये अडकवण्याचे विषारी राजकारण सुरू झाले आहे . पण याद राखा आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला तर हा कुटील डाव तुमच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही अशी टिका राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कुणाचे नाव न घेता केली .

नागरदेवळे येथील ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते महेश झोडगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात तनपुरे बोलत होते . कालच नगर तालुक्यातील शिवसेना नेते व तनपुरे यांचे समर्थक गोविंद मोकाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला . या पाश्वभुमिवर तनपुरे यांनी सुचक विधान नाव न घेता टिका केली . मात्र त्यांच्या टिकेचा रोख हा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्याकडेच होता अशी चर्चा कार्यक्रम स्थळी सुरू झाली . महेश झोडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले शंभर रक्तदात्यांनी रक्त दान केले .गरजू माहिलांना ब्लॅकेंटचे वाटप यावेळी करण्यात आले. कराटे प्रमाणपत्र देण्यात आले .  यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर , बाळासाहेष बोराटे दत्ता जाधव , जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, जिल्हा परीषद सदस्य  संदेश कार्ल, शिवसेना तालुका प्रमुखराजेंद्र भगत , संदिप गुंड , रोहीदास कर्डीले, केशव बेरड , प्राविण कोकाटे , दत्ता ताप फिरे , सचिन जाधव , अनिल बोरुडे , अभिषेक भगत , अमोल जाधव यावेळी उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post