वाळूंज येथे ‘सभापती चषक’ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ

 वाळूंज येथे ‘सभापती चषक’ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभनगर - तालुक्यातील वाळूंज येथे शिवांश क्रिकेट क्लब आयोजित सभाषती चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के,भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, सरपंच सुखदेव दरेकर, बाळासाहेब दरेकर आदी उपस्थित होते. 29 डिसेंबरपर्यंतही ही स्पर्धा चालणार आहे. यात विजेत्यांवर रोख बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. संतोष म्हस्के यांनी ट्रॉफी व जर्सी किटसाठी सहकार्य केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post