विरोधी मंडळाकडे अडीच वर्षात सेवा समाप्ती होत असलेले 4 उमेदवार, जि.प.आरोग्य संघटनेचे नेते विलास शेळके यांची टिका

 विरोधी मंडळाकडे अडीच वर्षात सेवा समाप्ती होत असलेले 4 उमेदवार,  जि.प.आरोग्य संघटनेचे नेते विलास शेळके यांची टिका 

नगर : संस्थेचे सभासद फार सुज्ञ आहेत. तेच विरोधकांना धडा शिकवतील. आम्ही वचनपूर्ती व संकल्प नामा  सभासदांना पुढे मांडत आहोत. प्रचाराचा झंझावात सुरू असून सभासद मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. असा दावा जि.प.आरोग्य संघटनेचे नेते विलास शेळके यांनी केला आहे 

 सेवेची फक्त अडीच वर्ष बाकी असताना मग संचालक पदासाठी अट्टहास का? असा सवाल करत  कडूस यांनी विरोधी श्री पावन गणेश मंगलमूर्तीवर तोफ डागली.आगामी अडीच वर्षात सेवा समाप्ती होत असलेले चार उमेदवार विरोधी मंडळाकडे आहेत. यामध्ये मंडळ प्रमुखांचा समावेश आहे. पुन्हा अडीच वर्षानंतर या चार जागेसाठी निवडणूक घ्यायची का? असा प्रश्न शेळके यांनी यावेळी उपस्थित केला.

अडीच वर्षानंतर स्वीकृत संचालक निवडण्याचा यांचा डाव आहे. मात्र सभासद मतदारांच्या अधिकारावर हा घाव आहे.असा टोला  शेळके यांनी विरोधकांना लगावला. त्यावेळी विरोधक मर्जीतील लोकांची स्वीकृत संचालक पदी वर्णी लावल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सभासद पाच वर्षासाठी लोकांमधूनच सर्व संचालक निवडून देतील. असा विश्वास जय श्री गणेश मंडळाचे  शेळके यांनी व्यक्त केला. . सर्वांना बरोबर घेऊन सभासदांच्या न्यायहक्कासाठी आमचा लढा असल्याचाही दावा शेळके यांनी यावेळी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post