त्यांनी मोकाटेंवर खोटा गुन्हा दाखल केला...हिंमत असेल तर जेऊर गटातील उमेदवार जाहीर करा... नगर तालुका महाविकास आघाडीचे थेट आव्हान!

त्यांनी मोकाटेंवर खोटा गुन्हा दाखल केला...हिंमत असेल तर जेऊर गटातील उमेदवार जाहीर करा... नगर तालुका महाविकास आघाडीचे थेट आव्हान!नगर तालुका- नगर तालुक्यातील बाजार समिती व इतर गैरव्यवहार उघड केल्यानेच गोविंद मोकाटे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले तसेच यामागचा मास्टर माईंड कोण आहे याची संपूर्ण तालुक्यातील जनतेला माहिती असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.

        शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी मोकाटे यांना जेऊर गटातून उमेदवारी जाहीर केली. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही उमेदवार जाहीर करावा असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले. गोविंद मोकाटे यांच्या वर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांना दोषी ठरवणारे तुम्ही कोण? आमचा न्यायव्यवस्था व पोलिस यंत्रणेवर संपूर्ण विश्वास असुन लवकरच सत्य बाहेर येईल. तुमच्यावर किती गंभीर गुन्हे दाखल असताना आपण निवडणूक लढवली याचे आत्मचिंतन करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला.

    नगर तालुक्यात सुसंस्कृत आणि विकासाचे राजकारण केले जात होते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून नगरच्या राजकारणाची प्रतिमा खालावली आहे. गोविंद मोकाटे आणि त्यांच्या परिवाराला जीवनातून, राजकारणातून उठविण्याचा प्रयत्न सध्या चालविला आहे. मोकाटे प्रकरणात कर्डिलेच मास्टरमाईंड आहेत असा आरोप नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.       मोकाटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने आरपीआयच्यावतीने जिल्हाप्रमुख गाडे यांच्या पुतळ्यास जोडे मोरो आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर नगर तालुका महाविकास आघाडीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, बाळासाहेब हराळ, उपसभापती डॉ. दिलीप पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, बाबासाहेब गुंजाळ, माजी सभापती रामदास भोर, रविंद्र भापकर, केशव बेरड, प्रकाश कुलट, प्रविण गोरे, संदिप गुंड, व्हि.डी. काळे, गुलाब शिंदे आदी उपस्थित होते.

        जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके म्हणाले, माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांच्या काळात सुसंस्कृत आणि विकासाचे राजकारण व्हायचे, परंतु आता वैयक्तिक आणि दुसर्‍या आयुष्यातून उठविण्याचे राजकारण सुरु आहे. ते आता लोकप्रतिनिधी राहिले नसल्याने काहीच मुद्दा नसल्याने दुसर्‍याचे आयुष्य उद्वस्त करण्याचे काम विरोधक करत आहेत.

       संदेश कार्ले म्हणाले, मोकाटेंना राजकाणातून संपविण्यासाठी कोण षडयंत्र रचत आहे सर्वांना माहित आहे. गाडे सरांनी उमेदवार जाहीर केला तर तुम्हीही उमेदवार जाहीर करा. समोरा समोरा लढाई होवू द्या, संसार उद्वस्त करण्याचे काम करु नका. अन्यथा आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल असा इशारा दिला.

      बाळासाहेब हराळ म्हणाले, विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने प्रतिष्ठीतांना राजकारणातून संपविण्याठी षडयंत्र रचले जात आहे. आम्ही मंजूर केलेल्या विकास कामांचे उद्घाटन विरोधक करत आहेत. 25 वर्षात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी नगर तालुक्यासाठी काय केले हे त्यांनी जाहीर सांगावे. आम्ही आमच्या कामाचा हिशोब देतो

      राजेंद्र भगत म्हणाले, नगर तालुका बाजार समितीमधील गैरव्यवहार झाकण्यासाठी, विषय दुसरीकडे वळविण्यासाठी षडयंत्र रचून मोकाटेंवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी शरद झोडगे, केशव बेरड, बाबासाहेब गुंजाळ यांनीही विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.


मोकाटे यांनी पुरावे सादर केले आहेत

गोविंद मोकाटे यांनी त्यांच्या वर दाखल झालेल्या गुन्ह्यासाठी पुरावे सादर केले आहेत. त्यानुसार न्यायालयात काय ते सिध्द होणार आहे. परंतु तुमच्यावर किती गुन्हे दाखल आहेत. याचे प्ररिक्षण करा. तसेच बहुतेक प्रकरणात "तोच" सामाजिक कार्यकर्ता पुढे येतो. त्यामागचे गौडबंगाल काय आहे.

. बाळासाहेब हराळ

नगर तालुका राजकारणात कुप्रसिद्ध केला

नगर तालुका राजकारणात कुप्रसिद्ध केला गेला आहे. अगोदर हाणामारी, दडपशाही चालू होती. आता तर राजकारणाची पातळी खुपच खालावल्याचे मोकाटे प्रकरणातुन दिसुन येते. आम्ही सत्तेचा कधीही दुरुपयोग करणार नाही अन् इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्याची आमची माणसिकता ही नाही.

.संदेश कार्ले (जिल्हा परिषद सदस्य)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post