छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा राष्ट्रवादीकडून निषेध,शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा राष्ट्रवादीकडून निषेध

मार्केटयार्ड मधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक 

कर्नाटक सरकारचा निषेध करुन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणीअहमदनगर(प्रतिनिधी)- बंगळुरू जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात कर्नाटक सरकारचा निषेध करुन, मार्केटयार्ड मधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आले. 

या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवक जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी सेलचे अमित खामकर, अर्बन सेलचे प्रा. अरविंद शिंदे, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, अ‍ॅड. गजेंद्र दांगट, घनश्याम सानप, वकिल सेलचे अ‍ॅड. योगेश नेमाणे, तुषार कटारिया, पंकज देशमुख, पंकज खरपुडे, मळू गाडळकर, विशाल बेलपवार, रवी दंडी, लहू कराळे, महेंद्र कवडे, मारुती पवार, दादा पांडूळे आदी सहभागी झाले होते.  

आंदोलकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेस किरकोळ म्हणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बम्मोई यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन त्यांचा राजीनामा घेण्याची व या घटने मागील समाजकंटकांनी कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, त्यांची विटंबना खपवून घेतली जाणार नाही. या विकृत मनोवृत्तीचे बिमोड करण्याची गरज असून, भाजप सरकारने अशा प्रवृत्तीना पाठिशी घालू नये, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post