मला परकीय म्हणता, मी पाकिस्तानातून आलोय का ?...आ.निलेश लंके बरसले

 

मला परकीय म्हणता, मी पाकिस्तानातून आलोय का ?...आ.निलेश लंके बरसले नगर :  पारनेर नगरपंचायत निवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत  आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आमदार नीलेश लंके यांनी एका कार्यक्रमात  माजी आमदार विजय औटी यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित व्हर्च्युअल रॅलीनंतर आमदार लंके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आमदार नीलेश लंके म्हणाले, पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भावनिक आवाहन करण्यास सुरूवात झाली आहे. परकीय आक्रमण थोपवा असे सांगितले जाऊ लागले आहे. मी स्वतः फोन रेकॉर्डींग ऐकले आहे. मी पारनेर - नगर मतदारसंघाचा आमदार आहे. पारनेर शहरातील मतदारांनीही मला मतदान केले आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. मला परकीय म्हणता, मी पाकिस्तानातून आलोय का ? मी दुसऱ्या तालुक्यातील आमदार आहे का? मी होतो त्यामुळेच मागच्या वेळी नगरपंचायतीची सत्ता आली. माझ्यामुळेच थोडीफार तरी वाचली नाही, तर ती देखील गेली असती ! अशी टीका आमदार लंके यांनी केली.
यावेळी पारनेरचे माजी सरपंच राजेंद्र तारडे तसेच इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, अशोक कटारिया, बाबाजी तरटे, गंगाराम बेलकर, सुदाम पवार, विक्रमसिंह कळमकर, अशोक घुले, अॅड. राहुल झावरे, डॉ.मुद्दसर सय्यद, डॉ. बाळासाहेब कावरे, विजय डोळ, अशोक कावरे, कारभारी पोटघन, सुवर्णा धागडे, आदी उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post