नगर जिल्ह्यातील नगरपालिकेच्या माजी नगरअध्यक्षा श्यामला ताडे यांची आत्महत्या

 श्रीगोंदा नगरपालिकेच्या माजी नगरअध्यक्षा श्यामला ताडे यांची आत्महत्याश्रीगोंदा शहराचे नगराध्यक्ष पद भूषविलेल्या श्यामला मनोज ताडे (वय वर्ष ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहत्या घरामध्ये गळ्याभोवती साडी गुंडाळलेला वर फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. दिनांक २० डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. किरण दगडू ताडे (वय वर्ष ४३) यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला या घटनेबाबत माहिती दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार श्यामला ताडे या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये अडीच वर्ष नगराध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षित जागेवर त्या निवडून आल्या होत्या. 


सदरील घटना धनश्री अपार्टमेंट श्रीगोंदा येथे त्यांच्या राहत्या घरात घडली आहे. पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांनी या घटनेनंतर अकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस कर्मचारी खारतोडे हे तपासी अधिकारी आहेत. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास चालू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post