हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून

हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून, 28 डिसेंबरला मुंबईत अंकिताचा विवाहसोहळामुंबई : भाजप नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील  यांची लेक लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार आहे. बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे यांच्याशी अंकिता पाटील  यांचा विवाह होणार असल्याची माहिती मिळतेय. हा विवाह सोहळा 28 डिसेंबर रोजी होणार आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरु होती. त्याची अधिकृत माहिती आज मिळाली आहे.

हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ इथे भेट दिली. त्यावेळी 28 तारखेला होणाऱ्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण दिल्याची माहिती मिळत आहे. अंकिता पाटील यांनी राज ठाकरेंसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी अंकिता पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post