नगर जिल्ह्यातील पालिकेच्या नगररचना विभागातील लिपिक 'एसीबी'च्या जाळ्यात

पालिकेच्या नगररचना विभागातील लिपिक 'एसीबी'च्या जाळ्यातअहमदनगर –   बिअर बार आणि परमिट रुमचा साठी आवश्यक असलेला नगरपरिषद चा नाहरकत दाखला मिळणे करिता २५ हजार रुपयांची लाचेची  मागणी करून तडजोडी अंती १२ हजार रुपये स्वीकारताना ला.प्र.वि.अहमदनगर विभागाने पाथर्डी  नगर परिषदेमधील अंबादास गोपीनाथ साठे (वय  ४४) लिपिक, नगररचना विभाग याला अटक केली आहे.या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना बिअर बार आणि परमिट रुमचा परवाना काढायचा असल्याने त्यांनी त्याकरिता आवश्यक असलेला नगरपरिषद चा नाहरकत दाखला मिळणे करिता नगरपरिषद पाथर्डी येथे अर्ज दिला होता. सदर अर्जावरुन नाहरकत दाखला देणे करिता यातील आरोपी लोकसेवक अंबादास गोपीनाथ साठे यांनी मुख्याधिकारी लांडगे यांचे करिता म्हणुन २५ हजार रुपयांची मागणी केली.

तक्रारदार यांनी ला.प्र.वि कडे दिलेल्या लाच मागणीचे  तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक अंबादास साठे यांनी मुख्याधिकारी लांडगे यांचे नावाने २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती १२ हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली म्हणून दिनांक ३१ डिसेंबर रोजी वर नमूद आरोपी अंबादास गोपीनाथ साठे यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन पाथर्डी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हाचा पुढील तपास हरिष खेडकर, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.अहमदनगर हे करीत आहेत.


 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post