अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लग्न हॉटेलमध्ये नवविवाहितेचा गळफास घेऊन आत्महत्या

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लग्न, पुण्यातील हॉटेलमध्ये नवविवाहितेचा गळफास पुणे : नवविवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉटेलमध्ये गळफास घेऊन तिने आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा आरोप आहे. पुण्यात सिंहगड रोड भागात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. कौटुंबिक वादातून लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात 32 वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचललं.

दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका महिलेने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. रंगोली भास्करराव वडावराव असं आत्महत्या करणाऱ्या 32 वर्षीय तरुणीचं नाव आहे.रंगोली पुण्यातील धानोरी भागातील रहिवासी होती. मात्र सिंहगड रस्ता परिसरातील एका हॉटेलमध्ये जाऊन महिलेने जीवनयात्रा संपवली. हॉटेलच्या रुममधील फॅनला गळफास घेऊन तिने आयुष्याची अखेर केली.

प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post