सहा महिन्यात येणार तीन वर्षांच्या पुढील मुलांसाठी लस

 सहा महिन्यात येणार तीन वर्षांच्या पुढील मुलांसाठी लस, अदर पुनावालांनी दिली माहिती मुंबई :  कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली आहे. अशातच भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे कोरोना नियमावलीमध्येही बदल करण्यात आले आहेत. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत पात्र लोकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे. सध्या 18 वर्षाच्या पुढील प्रत्येकाला लस मिळत आहे. तर आता तीन महिन्याच्या पुढील मुलांनाही कोरोना लस मिळणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ  अदर पूनावाला  यांनी दिली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आयोजीत करण्यात आलेल्या सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये  बोलताना अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे. पुढील सहा महिन्यात तीन वर्षाच्या वरील मुलांसाठी कोरोना लस विकसीत केली जाईल. असे पुनावाला यांनी सांगितले. शिवाय उपलब्ध डेटाच्या आधारे हे सांगणे सुरक्षित राहिल की, बूस्टर लसीचे डोस अँटीबॉडीज मिळविण्यासाठी चांगले धोरण आहे, असेही पुनावाला यावेळी म्हणाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post