काळजी घ्या...राज्याची वाटचाल तिसऱ्या लाटेच्या दिशेने, ओमायक्रॉन बाधितही वाढले

 काळजी घ्या...राज्याची वाटचाल तिसऱ्या लाटेच्या दिशेने, ओमायक्रॉन बाधितही वाढलेमुंबई : महाराष्ट्र आणि राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांची आणि ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढू लागलीय. मुंबईत गेल्या चोवीस तासात 1377 रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील ही 216 दिवसानंतरची सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. मुंबईत 26 मे रोजी 1352 रुग्णांची नोंद झाली होती. दुसरीकडे महाराष्ट्रातील रुग्णसंख्येनं 2 हजारंचा टप्पा ओलांडला आहे. तब्बल 75 दिवसानंतर रुग्णसंख्येनं 2172 रुग्णसंख्येची नोंद झाली. वाढती रुग्णसंख्या ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 653 वर पोहोचली असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात 167, दिल्ली 165, केरळ 57 आणि गुजरातमध्ये 54 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील 91 बाधित बरे देखील झाले आहेत. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत नोंदवली गेलीय. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post