पिस्तूल परवाना मिळवण्यासाठी सरपंचानेच रचला स्वतःवरील हल्ल्याचा बनाव

 पिस्तूल परवाना मिळवण्यासाठी सरपंचानेच रचला स्वतःवरील हल्ल्याचा बनाव ; तपास सुरुपुणे – जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे जिल्ह्यात पिस्तूल वापराच्या परवान्यासाठीच्या मागणीत वाढ होताना दिसत आहेत. पिस्तूल बाळगण्याचा परवाना मिळवण्यासाठीही अनेकजण धडपड करताना दिसून येत आहेत. अशातच एका धक्कादायक घटना समोर आली आहे. पिस्तुल बाळगण्याचा परवाना मिळावा यासाठी थेट स्वतःवर जीवघेणा हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचेची चर्चा तालुक्यता रंगली आहे.

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावच्या अतिउत्साही सरपंचावर काही महिन्यापूर्वी रस्त्यावर खुनी हल्ला झाल्याची तक्रार खेड पोलिसांत दाखल झाली होती. त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित सरपंच स्वतःच्या चारचाकी वाहनाने रात्रीच्या वेळी घरी परतत होता. त्याचवेळी अचानक समोरुन दोन दुचाकीवर चौघेजण आले. त्यांनी चाराचाकी वाहनाला आपल्या दुचाकी आडव्या लावल्या. त्यानंतर दगडाने चारचाकीच्या काचा फोडता त्यांनी  पिस्तुल सरपंचावर रोखले . मात्र सरपंचाने चारचाकी वेगात पळवत स्वतःचा जीव वाचावला. असे त्याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post