मोकाटे प्रकरणाने जीवितास धोका, सुशांत म्हस्के यांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

 मोकाटे प्रकरणाने जीवितास धोका

आरोपीचे समर्थन करणार्‍या राजकीय पुढार्‍यांकडून धोका असल्याचा आरोप
आरपीआयचे सुशांत म्हस्के यांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन


 नगर  - महिलेचे लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालेल्या गोविंद अण्णा मोकाटे या आरोपीचे समर्थन करणार्‍या राजकीय पुढार्‍यांकडून पिडीत महिला व सदर गुन्हा दाखल होण्यास महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे स्वत:च्या जीवितास धोका असल्याचे निवेदन आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी पोलिस अधीक्षकांना दिले.    


दिलेल्या निवेदनात सुशांत म्हस्के यांनी म्हंटले आहे की, गोविंद अण्णा मोकाटे या राजकीय व्यक्ती विरोधात महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 4 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला. पीडित महिला ही मागासवर्गीय असल्याने न्याय मिळण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या कार्यालयात आली होती. पीडित महिलेला न्याय मिळण्यासाठी आरपीआच्या माध्यमातून मोठा संघर्ष करून सदर राजकीय व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या एका प्रकरणात नव्हे तर यापूर्वी देखील पीडित लोकांना न्याय मिळण्यासाठी आरपीआयच्या माध्यमातून अनेक आंदोलनेही करण्यात आलेली आहे. काही दिवसापासून या विषयांमध्ये चुकीचा संदेश पसरवून गैरसमज निर्माण केले जात आहे.
या प्रकरणातील आरोपी गोविंद मोकाटे यांचे जिल्ह्यात मोठे राजकीय वजन आहे. ते आरोपी असून देखील जिल्ह्यातील मोठे नेते उघडपणे मदत करताना दिसत आहे. त्यामध्ये शशिकांत गाडे, बाळासाहेब हराळ, प्रताप पाटील शेळके, संदेश कार्ले, संपत म्हस्के, सुंदर मोकाटे यांनी तर जाहीर पत्रकार परिषद घेऊन त्याला तो आरोपी नाही, गुन्हेगार नसल्याचे जाहीर केले. आम्ही सर्व महाविकास आघाडी सत्तेत आहोत. आम्हाला माहिती असते, तर गुन्हा दाखल होऊ दिला नसता असे बरेच काही विधाने केली आहेत. हा सर्व प्रकार महिला दलित कुटुंबातील आहे म्हणून त्याचे एवढे धाडस झाले. पीडित महिला उच्चवर्णीय असली तर चित्र वेगळे असते. कदाचित त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली असती. परंतु वरील सर्व व्यक्ती राजकीय व धनदांडगे आहेत. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. मी व पीडित मुलगी एक सर्वसाधारण कुटुंबातील आहोत. उद्या या प्रकरणामुळे आमच्या जीवाचा बरेवाईट झाल्यास त्याला सदर राजकीय व्यक्ती जबाबदार राहणार असल्याचे म्हस्के यांनी म्हंटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post