कर्जत नगरपंचायत निवडणुक....आ.रोहित पवार यांनी घेतला सोमय्या, चंद्रकांत पाटील यांच्या टिकेचा समाचार

कर्जत नगरपंचायत निवडणुक....आ.रोहित पवार यांनी घेतला सोमय्या, चंद्रकांत पाटील यांच्या टिकेचा समाचार नगर: कर्जत नगर पंचायत निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा दावाही त्यांनी केलाय. 

भाजपच्या लोकांनी किरीट सोमय्या यांना जे काम दिलं आहे ते योग्य पद्धतीनं करत आहेत. ईडीला ज्या बातम्या कळत नाहीत त्या सोमय्या यांना आधी कळतात. ते जसे भाजपचे प्रवक्ते आहेत तसेच ईडीचेही प्रवक्ते आहेत. सिनेमा कितीही चांगला असला तरी आयटम साँग घ्यावेच लागते. सोमय्या हे राजकारण करत आहेत हे सर्वांनाच कळतं. आजही ते आमच्या नेत्यांबद्दल बोलतील. मात्र, कर्जतमधील नागरिक सूज्ञ आहेत. ते फक्त मनोरंजन म्हणून टाळ्या वाजवून जातील, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे.


भाजपचे लोक आमच्याकडे येत असतात. तर हे प्रश्न त्यांना विचारला हवा की ते राष्ट्रवादीमध्ये का येत आहेत? चंद्रकांत पाटलांनी ट्वीट करुन विचारलं एका-एका जागेवर रोहित पवार लक्ष देत आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की पैशाच्या जोरावर ते राष्ट्रवादीत घेत आहेत. मग तुम्ही काय ईडीच्या जोरावर राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये घेता काय? असा खोचक सवालही रोहित पवारांनी विचारलाय. चंद्रकांत पाटलांनी ट्वीट केलं त्याचं मला आश्चर्य वाटत असल्याचंही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post