माजी मंत्री राम शिंदे, प्रा.भानुदास बेरड गोवा विधानसभा निवडणुकीची खिंड लढवणार, देवेंद्र फडणवीस यांच्या खास टीममध्ये समावेश

 

माजी मंत्री राम शिंदे, प्रा.भानुदास बेरड गोवा विधानसभा निवडणुकीची खिंड लढवणार, देवेंद्र फडणवीस यांच्या खास टीममध्ये समावेशनगर: गोवा राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. फडणवीस यांनी मिशन गोवा साठी महाराष्ट्रातून टीम तयार केली असून यात नगर जिल्ह्यातील माजी मंत्री राम शिंदे, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांना स्थान देण्यात आले आहे. त्यानुसार शिंदे, बेरड थेट गोव्यात दाखल झाले आहेत.   गोवा(पणजी) येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीस नगर जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी उपस्थित होते.  .

यात भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष  राम शिंदे साहेब,प्रदेश कार्यकारणी सदस्य  भानुदास बेरड सर,नगर तालुका अध्यक्ष मनोजजी कोकाटे व सागर भोपे यांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post