नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावले निर्बंध....खा.सुजय विखे-पाटील म्हणतात...

 अर्बन बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी आरबीआय व अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करू - खा. डॉ. सुजय विखेनगर - नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सहकार पॅनलवर सभासदांनी विश्वास व्यक्त करून एकतर्फी विजय मिळाल्याबद्दल चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालकांंचे अभिनंदन करण्यासाठी मी अर्बन बँकेत आलो आहे. काल सायंकाळी आरबीआयने जरी अर्बन बँकेवर निर्बंध लादले असले, तरी बँक वाचली पाहिजे, अशी भूमिका घेत अर्बन बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी खासदार या नात्याने केंद्रीय अर्थमंत्री व आरबीआयकडे पाठपुरावा करणार आहे. माझ्मा यशात स्व. दिलीप गांधी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी केलेल्या सहकार्याची परतफेड करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे अर्बन बँकेला पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन खा. डॉ. सुजय विखे यांनी दिले.

     नगर अर्बन बँकेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन व नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यासाठी खा. विखे आज सकाळी अर्बन बँकेत आले होते. यावेळी बँकेच्या वतीने चेअरमन राजेंद्र अग्रवाल व व्हा. चेअरमन दीप्ती गांधी यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. याप्रसंगी सहकार पॅनेलचे नेते सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ संचालक अशोक कटारिया, अनिल कोठारी, शैलेश मुनोत, अजय बोरा, मनीष साठे, कमलेश गांधी, ईश्वर बोरा, राहुल जामगावकर, संपतलाल बोरा, गिरीश लाहोटी, बँकेचे मुख्य व्यवस्थापक सतीश रोकडे, प्रमुख व्यवस्थापक एम. पी. साळवे, वरिष्ठ अधिकारी सुनील काळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव आदींसह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

खा. विखे पुढे म्हणाले की, अर्बन बँकेवर निर्बंध आले आहेत, असे कळले असले तरी नियोजित कार्यक्रमानुसार मी बँकेत आलो आहे. बँकेचे कामकाज सुरळीत सुरू झाले असताना, अचानकपणे बँकेवर निर्बंध येणे ही दुर्दैवी बाब आहे. पण मला विश्वास आहे की अर्बन बँक पुन्हा सुस्थितीत येईल. बँकेला म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, यासाठी लवकरात लवकर आरबीआयच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन अर्बन बँकेची बाजू मांडणार आहे. विखे व गांधी कुटुंबीयांचे वर्षानुवर्षे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे स्व. गांधी यांच्या अर्बन बँकेला पूर्ण सहकार्य खासदार म्हणून मी सहकार्य करीन.

      यावेळी सुवेंद्र गांधी म्हणाले की, बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या मागे खा. डॉ. सुजय विखे यांनी उभे राहून आमचा विजय सुकर केला. प्रशासक असतानाही आम्ही वसुलीसाठी प्रयत्न केला. बँकेची सुत्रे हातात घेतल्यानंतर बँकेच्या ठेवी वाढवण्यास सुरुवात केली होती. अर्बन बँकेचा वाढलेला एनपीए कमी करण्यासाठी थकित कर्जवसुलीचे नियोजन बँकेच्या नूतन संचालक मंडळाने केले आहे. यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार काम सुरु केले होते. बँकेवर झालेला अन्याय दूर व्हावा, यासाठी खा. विखे यांनी सहकार्य करावे. अशी विनंती त्यांनी केली.

       चेअरमन राजेंद्र अग्रवाल म्हणाले की, अर्बन बँकेवर प्रशासक असतानाही निर्बंध होते. मात्र, त्यावेळी खात्यातून पैसे काढण्याचे निर्बंध नव्हते. काल रिझर्व्ह बँकेने बँकेवर लादलेले निर्बंध अन्यायकारक आहेत. आरबीआयने आमचे म्हणणे मांडण्याची संधी देणे आवश्यक होते. बँकेवरील निर्बंध मागे घेतले जावेत, यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील राहणार आहे.

      यावेळी संचालक अशोक कटारिया, अनिल कोठारी आदींची भाषणे झाली. अ‍ॅड. राहुल जामदार यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश रोकडे यांनी आभार मानले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post