रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी केली दगडफेक

 

रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी केली दगडफेकजळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा वाद अजून संपलेला नाही तोच आता रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची किरकोळ तोडफोड झाली असून रोहिणी खडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार रोहिणी खडसे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे हळदी समारंभात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. या कार्यक्रमाला हजेरी लावून त्या मुक्ताईनगरकडे आपल्या गाडीत परत येत होत्या. यावेळी त्यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने अचानकपणे हल्ला केला. यामध्ये रोहिणी खडसे प्रवास करत असलेल्या कारचा काच फुटला आहे. तर खडसे यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलीय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post