विधानपरिषद निवडणुकीत पराभव...शिवसेनेची 'नव्या' मित्रांवर नाराजी... विश्वासाला तडा गेल्याची भावना

 

विधानपरिषद निवडणुकीत पराभव...शिवसेनेची  'नव्या' मित्रांवर नाराजी... विश्वासाला तडा गेल्याची भावनानवी दिल्ली: अकोला विधान परिषद निवडणूक चुरशीची झाली. पण या निवडणुकीत आम्हाला आघाडीची पूर्ण मते मिळाली नाहीत. त्यामुळे विश्वासाला कुठे तरी तडा जात असून आता आघाडीतील तिन्ही पक्षांनी त्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे, असं विधान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे. अकोल्यातील पराभवानंतर शिवसेनेकडून पहिलीच जाहीर प्रतिक्रिया आली आहे.

अकोला विधान परिषदेत आमच्याकडे आकडा नव्हता. पण आमचा उमेदवार तगडा होता. तीन वर्ष ते सलग निवडून आले आहेत. या निवडणुकीत आघाडीकडे एकूण 408 मते होती. भाजपची स्वत:ची 225 मते होती. वंचित आघाडी आणि इतरांची मिळून त्यांचाही आकडा 400वर गेला होता. म्हणजे दोन्ही पक्षाकडे समसमान मते होती. पण आमची शंभर टक्के मते आम्हाला मिळायला हवी होती. ती मिळाली नाही. शिवसेनेची मते नगण्य आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते सर्वाधिक आहे. त्यामुळे कुठे तरी विश्वासाला तडा जात आहे. पण कोण्या एका पक्षाला दोष देऊन चालणार नाही, असं सावंत म्हणाले. विश्वासाला तडा हा आघाडीतील सर्व पक्षांशी संदर्भात आहे. कुण्या एका पक्षाला दोष देत नाही. आम्हीही त्यावर विचार केला पाहिजे. हा पराभव आमच्यासाठी धक्कादायक आहे, असंही त्यांनी सांगितलं

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post