तिसरी लाट आली...महाराष्ट्र लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर, राज्यातील बड्या मंत्र्याचे स्पष्ट संकेत

 

तिसरी लाट आली...महाराष्ट्र लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर,  राज्यातील बड्या मंत्र्याचे स्पष्ट संकेतमुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना आता मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहोत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होणार असल्याचंदेखील ते म्हणाले आहेत.

 


मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 मराठीला कोरोनाची तिसरी लाट आणि रुग्णसंख्या याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्र लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात रुग्ण वाढले आहेत. लॅाकडाऊन लागलं तर शाळा, मुंबई लोकल अशा अनेक सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यात सध्या लॅाकडाऊनची स्थिती येत आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढलाय. तिसरी लाट आली आहे. राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारीत विस्फोटक परिस्थिती राहील. रुग्णवाढ पाहिली तर लॅाकडाऊन शिवाय पर्याय नाही,” असे विजय वडेट्टिवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post