मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार्यकर्त्याच्या घरी भोजन


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार्यकर्त्याच्या घरी भोजनपुणे:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांनी पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष संतोष चव्हाण यांचा घरी जेवणाचा आस्वाद घेतला. सोबत मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागासकर, सरचिटणीस किशोर शिंदे, मनसे राज्य सचिव सचिन मोरे, उपाध्यक्ष बाळा शेडगे, गगरसेवक वसंत मोरे, श्रीनिवास घाटगे हेही उपस्थित होते. कमरेवर झालेल्या शस्त्रक्रीयेमुळे नेहमी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सोबत जमिनीवर पंगतीत बसणारे राज ठाकरे यांना यावेळी खुर्चीवर बसून जेवावे लागले. राज यांचा हा फोटो व्हायरल झाल्याने त्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post