नगर जिल्ह्यातील घटना.. वीज पंप सुरू करण्याच्या वादातून तरुणाची हत्या; मृतदेह विहिरीत फेकला

 वीज पंप सुरू करण्याच्या वादातून तरुणाची हत्या; मृतदेह विहिरीत फेकलापाथर्डी : विहिरीवरील वीज पंप सुरू करण्याच्या वादातून पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील भागवत मारुती गर्जे (३८) याचा खून करण्यात आला. डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालून ही हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. मारेकरी युवक पसार झाला आहे. हत्या झालेल्या भागवत गर्जेला चार मुली, पत्नी व आई, वडील असा परिवार आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या हत्याकांडाने पाथर्डी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.


वडगाव येथील रहिवासी बडे यांची जमीन भागवत गर्जे यांच्या वडिलांनी खरेदी केली होती. बडे यांचा पुतण्या व गर्जे यांच्यामध्ये जमिनीवरुन आणि विहिरीच्या पाण्यावरुन वाद होत होते. हा वाद पुढे आणखी चिघळत चालला होता. याच वादाचे पर्यावसन पुढे हत्येमध्ये झाले. हा वाद स्थानिक पातळीवर मिटवण्यासाठी पंचांनी बसून प्रयत्न केले होते. त्यानंतरही बडे आणि गर्जे यांच्यात मतभेद सुरुच होते. 27 डिसेंबरला रात्री साडेबारा वाजता भागवत गर्जे हा शेताला पाणी देण्यासाठी गेला होता. वीज कनेक्शनचा फ्युज उडाल्यामुळे तो बसवून भागवत विहिरीवर आला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post