तृतीय पंथीय करणार शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन

 बलात्कार करणार्‍या आरोपीला उमेदवारी जाहीर करुन समाजबांधवांच्या जखमेवर मीठ चोळले -सुशांत म्हस्के

तृतीय पंथीय करणार शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन
आरपीआय, आंबेडकर चळवळीतील घटक पक्ष व संघटनेची पत्रकार परिषद नग - लैंगिक शोषण झालेल्या मागासवर्गीय महिलेला आजी-माजी मंत्रींच्या राजकारणामुळे न्याय मिळण्यास उशीर होत आहे. यामधील आरोपीचा सत्ताधारी राज्य मंत्री बचाव करत असल्याने त्याला अटक होत नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे बलात्कार करणार्‍या आरोपीला उमेदवारी जाहीर करुन समाजबांधवांच्या जखमेवर मीठ चोळले असून, याचा आरपीआय, आंबेडकर चळवळीतील सर्व घटक पक्ष व संघटना निषेध करीत आहे. आरपीआय तृतीय पंथीय आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करणार असल्याचा इशारा आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी दिला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई), आंबेडकर चळवळीतील घटक पक्ष व संघटनेच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मागासवर्गीय महिलेला अत्याचार प्रकरणात न्याय मिळण्यासाठी भूमिका विशद करण्यात आली. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष म्हस्के बोलत होते. याप्रसंगी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे सुमेध गायकवाड, ऑल इंडिया पँथर सेनेचे योगेश थोरात, आरपीआय (आठवले) शहराध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, लोकशाही विचार मंचचे सोमनाथ शिंदे, पीआरपीचे अतुल भिंगारदिवे, दलित महासंघाचे सुरेंद्र घारु, रोहित आव्हाड, आरपीआय कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, ओबीसी घाडीचे विजय शिरसाठ, संतोष पाडळे, विकी प्रभळकर, सोनू भंडारी, प्रकाश कांबळे, किरण जाधव आदी उपस्थित होते.      


छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेऊन शिवसेना राजकारण करीत आहे. शिवाजी महाराजांनी बलात्कार करणार्‍यांना कठोर शिक्षा दिल्याचा इतिहास आहे. परंतु शिवसेनेचा कार्यकर्ता असलेल्या गोविंद मोकाटेने महिलेवर अत्याचार केले असून, जिल्हाध्यक्ष बलात्कार प्रकरणातील आरोपीची पाठराखण करुन त्याची उमेदवारी जाहीर करत असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करुन, उपस्थितांनी या प्रकरणाचा निषेध नोंदविला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post