राज्यात सलग तिसऱ्या दिवशी करोनाचा वाढता आलेख... ओमायक्रॉन बाधितही वाढले


राज्यात सलग तिसऱ्या दिवशी करोनाचा वाढता आलेख... ओमायक्रॉन बाधितही वाढलेमुंबई:  दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे.   राज्यात शुक्रवारी  1410  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 868  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णाचा स्फोट होईल, असेही सांगितले जातेय. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  राज्यात आतापर्यंत 65 लाख 1 हजार 243  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.69 टक्के आहे.  


राज्यात  शुक्रवारी  20 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली  आहे. आतापर्यंत 108 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 54 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post