जिल्ह्यातील बडे राजकीय नेते करोनाबाधित, गर्दीच्या कार्यक्रमात होता सहभाग


जिल्ह्यातील बडे राजकीय नेते करोनाबाधित, गर्दीच्या कार्यक्रमात होता सहभागनगर: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री प्राजक्त तनपुरे तसेच माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. आपल्या करोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी करोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन या नेत्यांनी केले आहे.

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे, असे ना. थोरात यांनी स्पष्ट केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.


हिवाळी अधिवेशनाची 28 डिसेंबरला सांगता झाली. दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही करोना झाल्याचे उघड झाले होते. त्यादेखील अधिवेशनात उपस्थित होत्या. त्यामुळे करोनाची लागण मंत्री थोरात, तनपुरे, विखे, पाटील यांच्यानंतर इतर आमदारांना होते की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post