शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनंतर शशी थरुर यांचाही राजीनामा

 शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनंतर शशी थरुर यांचाही राजीनामा; टीव्ही शो सोडलानवी दिल्ली: शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यानंतर आता काँग्रेस खासदार शशी थरुर यांनीदेखील सांसद टीव्हीचा कार्यक्रम सोडला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली. अधिवेशनाला सुरुवात होताच राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. त्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करत थरुर यांनी सांसद टीव्हीवरील कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला.

जोपर्यंत १२ खासदारांचं निलंबन मागे घेतलं जात नाही, तोपर्यंत शो होस्ट करणार नाही, अशी भूमिका शशी थरुर यांनी घेतली आहे. लोकसभेत थिरुअनंतपुरम मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असलेले थरुर सांसद टीव्हीवर 'टू द पॉईंट' कार्यक्रम होस्ट करतात.

'एका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी संसद टीव्हीचं निमंत्रण स्वीकारणं लोकशाहीच्या सर्वोत्तम परंपरांपैकी एक होतं. आमच्यामध्ये राजकीय मतभेद असले तरीही संसदेचे सदस्य म्हणून विविध संसदीय संस्थांमध्ये सहभागी होण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही हेच यातून दिसलं. निलंबित खासदार करत असलेल्या आंदोलनाला पाठिबा म्हणून टू द पॉईंट कार्यक्रम सोडत आहे,' असं थरुर म्हणाले. खासदारांचं निलंबन मागे घेतल्यास कार्यक्रमात पुन्हा सहभागी होईन. जोपर्यंत निलंबन रद्द होत नाही, तोपर्यंत कार्यक्रम करणार नाही, असं थरुर यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post