भारतात ओमिक्रॉनचे रूग्ण वाढले...राजधानी दिल्लीतही आढळला रूग्ण

भारतात ओमिक्रॉनचे रूग्ण वाढले...राजधानी दिल्लीतही आढळला रूग्ण नवी दिल्ली: भारतातील कोरोना विषाणूच्या  ओमिक्रॉन  वेरिएंटचा पाचवा रुग्ण समोर आलेला आहे. नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन  यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या वक्तीला लोकनायक जयप्रकाश नारायण  रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.  ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला व्यक्ती  37 वर्षांचा असून त्याच्यावर उपचार करण्यात आहेत. दिल्ली प्रशासन यामुळं सतर्क झालं आहे.

 

नवी दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण हा टांझानियातून आला होता. संबंधित व्यक्तीचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता भारतातील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. कर्नाटकमध्ये 2, गुजरातच्या जामनगरमध्ये 1 आणि महाराष्ट्रात एक आणि आता दिल्लीत एक अशा पाच रुग्णांची नोंद झाली आहे. परदेशातून आलेल्या 17 जणांना दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post