आमदार नितेश राणेंना दिलासा नाहीच, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

 आमदार नितेश राणेंना दिलासा नाहीच, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारलासिंधुदुर्ग : बेपत्ता असलेले भाजप आमदार नितेश राणे   यांना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने  झटका दिला आहे. शिवसेनेच्या संतोष परब   हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. दोन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर आज जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी अटकपूर्व जामीन नाकारला. दरम्यान, नितेश राणेंचे वकील उद्या उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहेत. 

नितेश राणे यांचे वकील आणि सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली आहे. नितेश राणे यांनी शिवसैनिक संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आहे. मागील तीन दिवसांपासून नितेश राणे हे अज्ञातवासात असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  नितेश राणे यांना प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा दावा त्यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी कोर्टात केला. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि नितेश राणे यांचा काहीही संबंध नसल्याचेही अॅड. देसाई यांनी सांगितले. तर, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. नितेश राणे हे पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकील घरत यांनी सांगितले. सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील यांच्यात खडाजंगी झाली. याप्रकणी सरकारी वकील हे वेळ काढण्याचे काम करत असल्याचा आरोप नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी केला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post