राजकीय नेत्याच्या 'त्या' व्हायरल अश्लील व्हिडीओ संदर्भात गुन्हा दाखल, व्हाट्सएप ग्रुपवर व्हिडीओ व्हायरल करणारे गोत्यात !


 'त्या' व्हायरल अश्लील व्हिडीओ संदर्भात गुन्हा दाखल, व्हाट्सएप ग्रुपवर व्हिडीओ व्हायरल करणारे गोत्यात !


४ डिसेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेच्या तक्रारी वरून एका राजकीय नेता असलेल्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या तक्रारीत अत्याचारित विवाहितेने आपण आरोपीचा अत्याचार कर्तेवेळीचा व्हिडीओ चित्रित केल्याचे तक्रारीत म्हंटले होते. यानंतर संबंधित अत्याचार करणाऱ्या आरोपीचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ ज्या मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सएपच्या ग्रुपला व्हायरल केला आहे त्या संधर्भात दोन मोबाईल क्रमांक धारकांवर आता सुंदर खंडू मोकाटे यांनी नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा रजिष्टर केला असुन कलम 769/2021 भादवि कलम 500, 502 सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत अश्लील पॉर्न व्हिडीओ व्हायरल करणारे संबंधितांचे मोबाईल नंबर तसेच व्हाट्सएपच्या ग्रुपचे नाव देण्यात आले आहे.

तक्रार देणारे मोकाटे यांनी तक्रारीत आपल्या भावाचे एका महिले सोबतचे बनावट अश्लील पॉर्न व्हिडीओ इमामपूर परिसरात व्हायरल केले जात असून त्याद्वारे कुटुंबाची प्रतिमा मलिन केली जात असून राजकीय आणि सामाजिक प्रतिमा हनन करण्याचे काम केले जात असल्याचे म्हंटले आहे. 

या दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बळप  हे करत आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post