खंडणी तसेच जबरी चोरीचा गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

 खंडणी तसेच जबरी चोरीचा गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी केले जेरबंदनगर - तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गु.रजि.नं568/2021 भां.द.वि. क. 397, 386 वगैरे प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सराईत आरोपी नाव विजय भगवान कोरडे वय 19 वर्षे राहणार गांधीनगर बोल्हेगाव अहमदनगर हा गुन्हा दाखल झाल्यापासून मिळून आला नव्हता याचा पोलिस शोध घेत होते परंतु तो पोलिसांना कायम हुलकावणी देत असे, दिनांक 26 /12/ 2021 रोजी पोलीस उपनिरीक्षक समाधान साळुंके यांना गोपनीय माहितीद्वारे समजले की सदर आरोपी हा जिमखाना मैदान एमआयडीसी येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल जपे, पोलीस नाईक वाकचौरे, पोलीस नाईक वसीम पठाण, पोलीस नाईक इनामदार, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल चेतन मोहिते,पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल केदार, यांनी तेथे  जाऊन सदर ठिकाणी सापळा लावून आरोपीस शिताफीने जेरबंद केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post