गोविंद मोकाटे यांनी महिलेवरील अत्याचार प्रकारणामुळे जिल्हयातच नव्हे तर राज्यात नाचक्की झाल्याने या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न

 बदनामी लपवण्यासाठी महाआघाडीकडून खोटे आरोप,माजी आमदार कर्डिले यांचा संबंध नाही 
नगर- पंचायत समितीचा माजी सदस्य गोविंद मोकाटे यांनी महिलेवरील अत्याचार प्रकारणामुळे नगर तालुका महाविकास आघाडी व त्यांच्या नेत्यांची अब्रू ची लक्तरे वेशीला टांगली आहे. तोंड दाखवायला जागा राहिली नाही. जिल्हयातच नव्हे तर राज्यात नाचक्की झाल्याने या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा केविलवाणा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून सुरु आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी आघाडीच्या नेत्यांनी मोकाटेची व्हिडीओ क्लिप बारकाईन पहावी, विश्वास नसेल तर त्याचे सरकार आहे. सरकारी यंत्रणेकडून तपासून घ्यावी.असे आवाहन कर्डिले समर्थकांकडुन पत्रकार परिषदेत करण्यात आले.


कोणी काय केले, कसे व्यभिचार केले काय कुटाने केले,  हे जेऊर गटातील लोकांना आणि नगर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकांना समजले आहे. या प्रकरणातील आरोपी कोण आणि फिर्यादी कोण हे पोलीस रेकॉर्ड वर आहे. त्यांचा आणि माजी आमदार कर्डीले यांचा कोठेही संबंध नाही. हे सर्व खोटं बनावट आहे असे महाआघाडी म्हणते तर फरार होण्याची गरज का पडली.   महाआघाडी मधील या लोकांनी नगर तालुक्याची प्रतिमा घालवली. झालेल्या घाणेरड्या प्रकरणाने जेऊर गटाची बदनामी झाली नगर तालुक्याची बदनामी झाली. घटना झाल्यानंतर महाआघाडीला माजी मंत्री कर्डीले यांच्यावर आरोप करण्याची आठवण झाली कारण गेल्या १० ते १५ दिवसात महाआघाडीचे लोक तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांना लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्यावरील लोकांचा राग. संताप कमी होण्यासाठी कर्डीले यांच्यावर खोटे आरोप केला जात आहेत. आरोप करताना त्यांनी काही पुरावें का दिले नाहीत ? चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत.


महाआघाडी ने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे आमची हरकत नाही. तुम्ही कोणत्या चालीचे आहेत, तुमची संस्कृती काय आहे. हे आता उघड झाले आहे. माजी मंत्री कर्डीले यांच्यावर विनाकारण खोटे आरोप करू नयेत. नगर तालुक्यातील जनतेला सत्य काय आहे माहिती आहे त्यांनी ते पहिले आहे. यांना गटात आणि गावातच  तोंड दाखवायला जागा राहिली नाही म्हणून तालुक्यातील जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी असे खोटे आरोप सुरू आहेत.. पण जनता सर्व काही ओळखून आहे. पांगरमल दारु कांडामध्ये बनावट दारुमुळे ११ लोकांचा मृत्यू झाला. त्या निवडणूकीमध्ये सदरची पार्टी कोणी आयोजित केली होती. बनावट दारु कोणी पुरविली होती, याची आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा नव्या सरकारच्या यंत्रणेकडून चौकशी करुन घ्यावी. आघाडीच्या नेत्यांनी दुष्कर्मावर पांघरुन घालण्याऐवजी तालुक्यातील विकासकामांकडे लक्ष दयावे.

आमच्या नेत्यावर खोटे आरोप सहन केले जाणार नाहीत. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल. येत्या काळात महाआघाडीचे सर्व काळे कारनामे जनतेसमोर पुराव्यानिशी मांडण्यात येतील याप्रसंगी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, सुरेशराव सुंबे, दिलीप भालसिंग, बाळासाहेब निमसे, बाबासाहेब खर्से, बहिरु कोतकर, बबनराव आव्हाड, श्रीकांत जगदाळे, संभाजी पवार, दिपक कार्ले, शिवाजी कार्ले, राम पानमळकर, बाजीराव हजारे, राजेंद्र शेळके, विलास शिंदे, संजय गारूडकर, राहुल पानसरे, उध्दव कांबळे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजू दारकुंडे, कैलास पटारे उपस्थित होते.

कर्डिले यांच्या वरच खोटे गुन्हे

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावरच अनेक खोटे गुन्हे दाखल करण्याचे पाप महाविकास आघाडीकडून करण्यात आल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी यावेळी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post