नगर जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून नवीन निर्बंध.... आदेश जारी


नगर जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून नवीन निर्बंध.... आदेश जारी नगर: राज्य सरकारच्या निर्देशानुसार नगर जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून नवीन निर्बंध लागू केले जाणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबर रोजी जारी केले आहेत.

1. विवाह समारंभ, बंद जागेमध्ये किंवा मोकळया जागेमध्ये आयोजित करताना उपस्थितांची संख्या जास्तीत

जास्त 50 व्यक्तीपुरती मर्यादीत राहील.

2. कोणत्याही मेळावे व कार्यक्रमांचे बाबतीत, मग ते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम

बंद जागेमध्ये किंवा मोकळया जागेमध्ये आयोजित करताना उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त 50

व्यक्तींपुरती मर्यादीत राहील.

3. अंत्यविधीसाठी उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त 20 व्यक्तींपुरती मर्यादीत राहील.

या आदेशात नमुद बाबींव्यतिरिक्त इतर बाबींसाठी संदर्भ क्र. 4 ते 8 चे आदेशामधील निबंध पुढील

आदेश होईपावेतो लागू राहतील.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post