पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून लांबवले अडीच लाख गुन्हा दाखल

 पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून लांबवले अडीच लाख ; अज्ञातावर गुन्हा दाखलपुणे – जिल्ह्यात चोरीच्या घटना राजरोसपणे घटना घडताना दिसून येत आहेत . राजगुरूनगर येथे दिवसाढवळ्या पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून गाडीतील दोन लाख 86 हजार रुपये लांबवल्याची घटना उघडकीस आले आहे. याबाबत पिकअप चालक अर्जुन लक्ष्मण सांवत, खेड याने पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन सांवत हे येथील गणेश रामभाऊ कोरडे यांच्या पिकअप गाडीवर चालक म्हणून आहे. गाडीमध्ये किराणा माल भरून वाडा, डेहणे, खेड येथे दुकानदारांना देण्यासाठी आले होते. दुकानदारांकडून चालक सांवत यांने पैसे गोळा करून पिक गाडीच्या डिकीत ठेवले होते. त्यानंतर राजगुरुनगर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर पुणे -नाशिक महामार्गालगत पिकअप गाडी उभी दरवाजा लॉक करून चालक सांवत हे धनश्री चौकातील धनश्री हॉटेलमध्ये बाथरुमला गेले असता, 10  मिनटांत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून 2 लाख 86 हजारांची रोकड लांबवली. माघारी येऊन बघितले असता गाडीचा दरवाजा उघडा दिसला. डिक्की खोलून बघितली असता , रक्कम गायब झालेली दिसून आली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post