विधानसभेत पंतप्रधानांची नक्कल, भाजप आक्रमक, शिवसेना आमदाराच्या निलंबनाची मागणी

 

विधानसभेत पंतप्रधानांची नक्कल, भाजप आक्रमक, शिवसेना आमदाराच्या निलंबनाची मागणीआज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख मंत्री नितीन राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्यानं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच भडकले. माफी मागा म्हणत हक्कभंग आणण्याचा इशारा देखील विरोधी पक्षनेत्यांनी दिला. वीजेसंदर्भातील एका प्रश्नावर बोलताना मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं की, 100 युनिट माफ करणार याकडे मी तुम्हांला घेऊन जाईल.  मी उर्जा मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर माझं व्हिजन सांगितलं होतं.  मात्र कोविडची परिस्थिती आली.  कंपनी चालवताना वीज बील भरले पाहिजे. सुट दिली पाहिजे असं म्हणत असतील तर देशाच्या पंतप्रधान यांनी म्हटलं होतं की 15 लाख रुपये  रुपये खात्यावर देणार म्हटलं होतं. त्यांनी दिलं का? असं राऊत म्हणाले. यावरुन फडणवीस कमालीचे आक्रमक झाले.  पंतप्रधान यांनी असं वाक्य कुठ म्हटलं आहे हे  दाखवा नाही तर माफी मागावी, असं ते म्हणाले.  यावर आमदार भास्कर जाधव यांनी काहीतरी नक्कल केली. यानंतर विरोधक जास्तच आक्रमक झाले. फडणवीस म्हणाले की, भास्कर जाधव यांना निलंबित करा. पंतप्रधानांचं अंगविक्षेप करत जाधव यांनी सभागृहात जे वर्तन केलंय ते चुकीचं आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post