माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्यमंत्री तनपुरेंवर बरसले.... म्हणाले... मंत्र्यांनी काय बांगड्या भरल्या काय?

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्यमंत्री तनपुरेंवर बरसले.... म्हणाले... मंत्र्यांनी काय बांगड्या भरल्या काय?अहमदनगर : वीज वितरणची थकबाकी भाजप सरकारमुळे वाढल्याचा आरोप ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला होता यावर विखे-पाटील यांनी तनपुरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तुमचं अपयश आणि पाप झाकण्यासाठी तुम्ही भाजप सरकारवर आरोप करत आहात. आता सरकार तुमचं आहे, तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? असा सवाल तनपुरेंना विखे-पाटलांनी केला आहे.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतीचे वीज कनेक्शन कापू नये, वीजबिलं माफ करावी ही मागणी करत शेकडो आंदोलकांच्या घोषणांनी संगमनेर शहर दुमदुमून गेले. गेल्या दोन वर्षापासून राज्यातील कोणताही घटक राज्य सरकाच्या कारभारावर समाधानी नाही. तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते तरी पूर्ण करा, अशी मागणी करत सरकारला केवळ वसुली करायचं माहीत आहे. राज्यातील सामान्य जनतेशी यांना काहीही देणं घेणं नाही असा घणाघाती आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post