कदम हे सर्वाना सोबत घेऊन कामकाज करणारे गुणवंत कर्मचारी...संतोष यादव

 श्री कदम हे सर्वाना सोबत घेऊन कामकाज करणारे गुणवंत कर्मचारी...संतोष यादव

बदली निमीत्ताने निरोप समारंभअहमदनगर:अहमदनगर प्रधान डाकघरातील श्री प्रकाश कदम सिस्टिम अडमीन यांची प्रमोशनमध्ये  ट्रान्सफर पुणे ग्रामीण विभागात सबपोस्टमास्तर नाव्हरे (शिरूर) येथे झाली आहे. 

त्यानिमित्ताने अहमदनगर प्रधान डाकघर येथे निरोपसोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनियर पोस्टमास्तर श्री संदीप कोकाटे हे होते.याप्रसंगी डाक कर्मचाऱ्याच्या वतीने श्री प्रकाश कदम यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला.


यावेळी बोलताना श्री संतोष यादव म्हणाले की,डाक विभागाच्या कामकाजामध्ये मागील काही दिवसांपासून मोठया प्रमाणात बदल होत आहे ,अश्यावेळी श्री प्रकाश कदम यांनी सिस्टिम अडमीन ची जबाबदारी स्वीकारत ,सर्वाना सहकार्य करत ,नवनवीन बदलाची माहिती सर्वाना देत त्याना नवीन बदलत्या प्रणाली मध्ये काम करण्यास मोलाची मदत केली.

ग्रामीण भागातील पोस्टऑफिस मधील RICT प्रणाली मध्ये सर्व ग्रामीण डाकसेवकाना मोठे सहकार्य श्री कदम यांनी केले,या सर्वाचा आढावा घेतला तर निश्चितच प्रकाश कदम हे अहमदनगर विभागास तेजोमय करणारा अनमोल हिराच आहे,अश्या गुणवंत कर्मचाऱ्यांची ट्रान्सफर ही आपणास निश्चितच वेदनादायी असणार आहे,पण नौकरी मध्ये बदली हा अविभाज्य भागच आहे ते स्वीकारातच आपणास पुढे जावे लागणार आहे.

यावेळी श्री तान्हाजी सूर्यवंशी,श्री सागर पंचारिया, श्री निसार शेख,श्री सतीश येवले,श्री उस्मान शेख,श्री नामदेव डेंगळे,श्री सलीम शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रमच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कमलेश मिरगणे यांनी तर आभार श्री विजय चाबुकस्वार यांनी केले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने डाक कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post