राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाचा शाही विवाह... सलमान खान, शिल्पा शेट्टी यांचा भन्नाट डान्स...

 

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाचा शाही विवाह... सलमान खान, शिल्पा शेट्टी यांचा भन्नाट डान्स...मुंबई: माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात अभिनेता सलमान खान  याने हजेरी लावली. या लग्नसभारंभात नाचताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा मुलगा प्रजय यांचा विवाहसोहळा नुकतंच पार पडला. या लग्नानिमित्त जयपूरमधील रामबाग पॅलेसमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उद्योगपती अनिल अंबानी, गौतम अदानी यांच्यासह इतर उद्योगपतींनी हजेरी लावली. त्यासोबतच बॉलिवूड अभिनेता सलमान खान, शिल्पा शेट्टी यांसह चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेते आणि राजकीय नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रुफल पटेल हे सलमान खान, शिल्पा शेट्टीसोबत डान्स करताना पाहायला मिळाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post