एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडले, शिवसेना आमदाराची गंभीर टिका...

 एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडले, शिवसेना आमदाराची गंभीर टिका... जळगाव: जळगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. एकनाथ खडसे यांनी जुन्या व्हायरल ऑडिओ क्लिपचा प्रश्न उपस्थित केला होता. आमदाराच्या ड्रायव्हरची एका महिलेसोबतची अश्लील ऑडिओ क्लिप असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका पाटील यांनी केली आहे.

एकनाथ खडसे यांचे संतुलन बिघडले आहे. खडसे यांची मुलगी मारण्याची भाषा करते. मधल्या काळात ही खडसेंनी माझ्यावर खोटेनाटे आरोप केले होते. त्यांची परिस्थिती चोरासारखी झाली आहे, अशी टीका शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. खडसेंनी एका महिलेबाबत भाषणात अपशब्द वापरला. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईत कलम 509 खाली गुन्हा दाखल आहे. 30 वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी होता. पण तुमच्या सारखा खोटारडा माणूस महाराष्ट्राला लोकप्रिय झाला नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.


खडसेंचा पोलिसांवर दबाव आहे. दबावाचे राजकारण करून खोटे गुन्हे दाखल करण्याची नीती खडसे कुटुंबीयांची आहे. कोणती ऑडिओ क्लिप दाखवता? ऑडिओ क्लिपशी माझा संबंध असला तर मी आमदारकीचा राजीनामा देईल, असं आव्हानच त्यांनी खडसेंना दिलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post