'पक्षातील विरोधकांना लवकरच धडा शिकवणार... नाना पटोले यांच्या इशार्याने कॉंग्रेसमध्ये खळबळ

'पक्षातील विरोधकांना लवकरच धडा शिकवणार... नाना पटोले यांच्या इशार्याने कॉंग्रेसमध्ये खळबळमुंबई:  विधानसभा अध्यक्ष निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यामुळे काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. राज्यपालांनी सही न केल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलावी लागली. यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी थेट दिली गाठली आहे. तसंच,  'पक्षातील विरोधकांना लवकरच धडा शिकवला जाणार आहे' असा इशाराच पटोले यांनी दिला आहे. पटोले यांनी इशारा दिल्यामुळे पक्षातील विरोधक कोण आहे, अशी चर्चा रंगली आहे.

नाना पटोले यांनी आज दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. पण   सोनिया गांधी यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले यांनी पक्षातील विरोधकांना चांगलाच इशारा दिला आहे.

'भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पाठीमागे राहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटायला आलो होतो, पण काही कारणामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, पण त्या नाराज नाही काही, काही कारणाने भेट झाली नाही, असं पटोले म्हणाले.

'पक्षातील विरोधकांना लवकरच धडा शिकवला जाणार आहे. ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले आहे, अशांचा शोध घेऊन कारवाई केली जाईल. फेब्रुवारीमध्ये विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. काँग्रेसचाच अध्यक्ष होईल, असं पटोले म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post