भाजपचा शिवसेनेला मोठा दणका....सेनेच्या विद्यमान आमदाराला धोबीपछाड!

भाजपचा शिवसेनेला मोठा दणका....सेनेच्या विद्यमान आमदाराला धोबीपछाड!

 


अकोला -   विधान परिषदेच्या दोन जागांच्या निकालांमध्ये भाजपाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. नागपूरपाठोपाठ अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषद मतदारसंघामध्येही भाजपाने शिवसेना आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला आहे. येथे भाजपाचे वसंत खंडेलवाल यांनी शिवसेनेचे मातब्बर नेते गोपिकिशन बाजोरिया यांना पराभूत केले आहे. अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व होते. मात्र महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतरही त्यांचे येथील वर्चस्व मोडीत काढण्यात भाजपाला यश मिळाले आहे. एकूण ८०८ मते असलेल्या या मतदारसंघामध्ये भाजपाचे वसंत खंडालवार यांना ४३८ मते मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना ३३० मतांवर समाधान मानावे लागले. येथेही महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडल्याचे दिसून आले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post