४ सख्खे भाऊ आमदार... देशातील दुर्मिळ उदाहरण...

 ४ सख्खे भाऊ आमदार... देशातील दुर्मिळ उदाहरण...बेळगाव - विधानपरीषद निवडणूकीत विजयामुळे जारकीहोळी बंधूंचे बेळगाव जिल्ह्यातील राजकीय वजन पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. शिवाय चार सख्खे भाऊ आमदार होण्याची घटना देशात पहिल्यांदाच घडली आहे. जारकीहोळी कुटुंबातील तिघे सध्या विधानसभेचे आमदार आहेत. आता लखन जारकीहोळी हे विधानपरीषद सदस्य झाले आहेत.जारकीहोळी सर्वात मोठे रमेश हे गोकाक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. भालचंद्र हे आरभावी मतदारसंघाचे आमदार आहेत. हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. सतीश जारकीहोळी हे यमकनमर्डी मतदारसंघाचे कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहेत. लखन हे मात्र अपक्ष म्हणून विधानपरीषदेवर निवडून गेले आहेत. सख्खे चौघे भाऊ आमदार होण्याचे हे देशातील दुर्मिळ उदाहरण आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post